समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली.
लाथा बुक्क्यांनी केली मारहाण
संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून महिला बोलवून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली. तसेच कपडे फाडले, लाथा बुक्क्यांनी मारहाण संचालकांचा हा राडा आता नागपाडा पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून कारवाई चालू आहे. संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन चूक केली असून पश्चाताप होतोय, अशी चर्चा एसटी सभासदांमध्ये पाहायला मिळाली आहे.
advertisement
एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे, अशी चर्चा कायमच असते.