मतदार यादीतून नावं कमी करण्यासाठी ७ नंबरचा फॉर्म भरला जातोय, मतदारांची नावं कमी केली जात आहेत.
खोट्या ऑनलाइन अर्जांचा पर्दाफाश मविआने केला. मतदार याद्यांमधून अनेक नावं वगळण्याचे आदेश भाजपनं दिल्याचा आरोप मविआने केला. महायुतीकडून रडीचा डाव खेळला जात आहे. हिंमत असेल तर समोर येऊन लढा असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं.
advertisement
लोकसभेत आघाडीला जिथं जास्त मतं मिळाली त्या मतदारसंघांमध्ये अडीच ते १० हजार मतं कमी कशी करता येतील यासाठी प्लॅनिंग महायुती करत आहेत. ज्या निवडणुका आपण जिंकूच शकत नाही त्यासाठी त्यांचा हा प्लॅन असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी थेट फडणवीस आणि शिंदेंवर आरोप केले. मतदान कार्डवर फोटो वेगळा आणि माणसू वेगळा असल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी कार्डचा फोटोच दाखवला.
फॉर्म नंबर ७ कोण भरतं याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. प्रत्येक मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर फॉर्म नंबर ७ भरला गेला आहे. अनेक ठिकाणे माणसं मृत दाखवली आहेत. ती जिवंत आहेत. सिन्नर मतदारसंघात ५ हजार नावं अशी शोधली गेली. जर त्यांना मृत दाखवलं होतं तर ती नावं परत कशी आली? सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. एकाच घरातली पाच माणसं वेगवेगळ्या बूथवर मतदानाला कशी जातात? असं कसं घडतं असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
असलेली नावं काढायची आणि नसलेली नावं त्यात भर टाकायची, हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. निवडणूक आयोगाने यावर कडक कारवाई करावी. निवडणूक आयोगाने वोटिंग फ्रॉम होम ही योजना आहे, वयस्क आणि दिव्यांगासाठी ही योजना आहे. पण ते मत घेताना प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी सोबत घेतल्याशिवाय अशा लोकांचे मतदान घेतले जाऊ नये अशी मागणी मविआकडून करण्यात आली.
