मिळालेल्या माहितीनुसार,येवल्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा शाब्दीक राडा नव्हता तर तलवारी रॉडने या घटनेत हाणामारी झाली होती.त्यामुळे या घटनेत एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत.या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक ४मधील निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून मोमीनपुरा भागात ही हाणामारी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला होता. त्यांनी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तलवारी आणि रॉडने हल्ले करण्यात आले होते.या घटनेत एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत.या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
advertisement
