मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. स्ट्रॉंग रूमच्या समोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. स्ट्राँग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दुसरीकडे प्रशासनाची बाजू अद्यार समोर येऊ शकलेली नाही.
उद्या पराभव होणार म्हणून रडारड सुरू- गोपीचंद पडळकर
मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित केली. अधिकृतपणे निवडणूक आयोगाने दिलेली ती माहिती नाही. उद्या होणारा पराभव झाकण्यासाठी अशी कारणे शोधली जात आहेत. तेथील सर्वसामान्य घरातील पोरगा प्रवीण माने याने अतिशय तादकीने निवडणूक लढवली आहे. काही सर्व्हेंच्या माध्यमातून हा मुलगा नगराध्यक्ष होऊ शकतो, असे सांगितले गेले आहे. त्यामुळे समोरील पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मग आता खापर कुणावर फोडायचे, म्हणून असले प्रकार सुरू आहेत, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
advertisement
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्ट्राँगरूमची काळजी असेल आणि ईव्हीएम मशीनची त्यांना फारच काळजी वाटत असेल तर वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या स्ट्राँगरूमबाहेर ड्युटी लावून टाकाव्यात, असा मिश्किल सल्लाही पडळकर यांनी दिला.
प्रशासनाचा भोंगळ कारभार- शशिकांत शिंदे
खरे तर असले प्रकार घडल्यानंतर प्रशासनाने समोर येऊन बोलले पाहिजे, स्पष्टीकरण दिले पाहिजे. पण प्रशासनाचे अधिकारी समोर काहीही बोलत नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये अधिक संभ्रम निर्माण होतो. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले.
