TRENDING:

आयुष्यभर संघर्ष, अखेर 77व्या वर्षी विजय मिळाला, नगरसेवक होताच जनाबाई ढसाढसा रडल्या!

Last Updated:

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 77 वर्षांच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या विजयानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
आयुष्यभर संघर्ष, अखेर 77व्या वर्षी विजय मिळाला, नगरसेवक होताच जनाबाई ढसाढसा रडल्या!
आयुष्यभर संघर्ष, अखेर 77व्या वर्षी विजय मिळाला, नगरसेवक होताच जनाबाई ढसाढसा रडल्या!
advertisement

जळगाव : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा त्सुनामी आला आहे. भाजपचे तब्बल 3 हजारांहून अधिकचे नगरसेवक तर 129 नगराध्यक्ष जिंकून आले आहेत. तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली आहे. महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये 22 व्या वर्षी नगराध्यक्ष तर 77 व्या वर्षी नगरसेवक झाल्याची रेकॉर्डही झाली आहेत.

advertisement

नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत हृदयस्पर्शी दृष्य पाहायला मिळालं. 77 वर्षांच्या जनाबाई भगवान रंधे या वृद्ध आजीबाईंनी नगरसेवकाच्या निवडणुकीत विजय मिळवला. मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर जनाबाई रंधे कार्यालयाजवळ आल्या, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालेल्या जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने जनाबाई भावुक झाल्या.

22 वर्षांची सिद्धी नगराध्यक्ष

दुसरीकडे मोहोळ नगर परिषदेवर महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे हिने नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या सिद्धीने एका महिन्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला आणि नगराध्यक्ष म्हणून निवडून यायचा विक्रमही केला. अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्ष झाल्यामुळे महाराष्ट्रभर सिद्धी वस्त्रेची चर्चा होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

सिद्धीचे वडील एका पतसंस्थेत कामाला असताना शिवसेना शिंदे पक्षाकडडून सिद्धीला उमेदवारी देण्यात आली. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत सिद्धी वस्त्रेवर मतदारांनी विश्वास दाखवला. सिद्धीने भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा फक्त 170 मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धीच्या उमेदवारीवरून आश्चर्यही व्यक्त केलं होतं. सीएच्या ऑफिसमध्ये काम करणारी सिद्धी अवघ्या एका महिन्यात मोहोळ नगर परिषदेची कारभारीण झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आयुष्यभर संघर्ष, अखेर 77व्या वर्षी विजय मिळाला, नगरसेवक होताच जनाबाई ढसाढसा रडल्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल