नागपूर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे हलके धक्के बसले आहेत. सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी हे भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहे. विशेष म्हणजे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.
advertisement
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मूलगु येथे भूकंपाचे हे केंद्रबिंदू असून त्याची तीव्रता 5.3 असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा छत्तीसगडमध्ये आलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता कशी होती? हे त्या सीसीटीव्हीतुन स्पष्टपणे समजून येत आहे. तेलंगणाच्या भद्राचलम शहरात आज सकाळी भूकंपाचा धक्का या सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय.
गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे सौम्य झटके बसले आहेत. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. या झटक्यांमुळे काही ठिकाणी घरातल्या भांड्या पडल्या होत्या. तसेच या भागात भूकंपाची तीव्रता अत्यंत सौम्य होती.
