पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणजेच 10 तारखेला श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर, बेळगाव-बंगळुरू आणि अजनी-पुणे वंदे भारत ट्रेनला सकाळी 9 वाजता हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर-पुण्यादरम्यान येणाऱ्या 9 स्थानकांवर थांबत होती. त्यात वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव या स्थानकांचा समावेश होता. तसेच असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत नगरी शेगाव येथील स्थानकावरही थांबा द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली होती.
advertisement
मुंबई-नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटले तरी CSMTला आलीच नाही, प्रवाशांचा संताप उतरले ट्रॅकवर
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला शेगाव थांबा
शेगावमध्ये रोज असंख्य भाविक दर्शनासाठी जातात. पुणे नागपूर वंदे भारत ही गाडी शेगावला जाता-येताना थांबल्यास त्याचा भाविकांना मोठा फायदा होऊ शकतो, तसेच रेल्वेलाही त्यातून मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर गुरुवारी रात्री रेल्वेचे कोचिंग डायरेक्टर संजय आर. नीलम यांच्या सहीनिशी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात वंदे भारत एक्स्प्रेसला शेगाव स्थानकावरही थांबा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, यवतमाळशी जुळता यावे म्हणून या गाडीला धामणगाव आणि चांदूर स्थानकावरही थांबे देण्यात यावे, अशीही मागणी त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ कार्यक्रम मुख्य रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यावेळी उपस्थित राहतील. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.