नागपूर : कुत्रा हा अनेकांचा आवडता पाळीव प्राणी आहे. त्यामुळे घरामध्ये वेगवेगळ्या जातींची विदेशी कुत्री पाळण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर पाहिला मिळते. पाळीव कुत्र्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाते. परंतु, रस्त्यावर भटकणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे कुणाचेही लक्ष नसते. अपघातामध्ये बऱ्याच वेळी कुत्र्यांना मार लागतो, कोणाला चालता येत नाही, यामुळे त्यांचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे हीच गोष्ट लक्षात घेऊन नागपुरातील स्मिता मिरे या भटक्या कुत्र्यांसाठी काम करत असून त्यांनी हक्काचं घर मिळवून दिलं आहे.
advertisement
कुत्र्यांसाठी चालवतात निवारागृह
स्मिता मिरे या 13 वर्षांपासून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत आहेत. त्या नागपूर शहरात कुत्र्यांसाठी निवारागृह चालवतात. याबद्दल माहिती देताना स्मिता यांनी सांगितले की, रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या कमी नाही. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा अपघाताचे बळी ठरतात. काही जण त्यांना नाल्यात फेकून निघून जातात, तर काहीजण त्यांना जाणीवपूर्वक दुखावण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत अर्धांगवायू आणि जखमी कुत्र्यांना आश्रय देण्यासाठी आम्ही सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन नावाची संस्था सुरू केली आहे. यामध्ये आम्ही त्यांच्या जेवणाचा आणि औषधाचा खर्च उचलतो.
250 हून अधिक कुत्रे
पुढे बोलताना स्मिता म्हणाल्या की, लोकांकडून भटक्या कुत्र्यांना उद्धटपणे वागवले जात असल्याचे पाहून मी निवारागृह सुरू केले. इथे वृद्ध आणि आजारी प्राण्यांना आश्रय दिला जातो. कुत्रे आणि मांजरांसोबतच आम्ही इतर प्राण्यांनाही वाचवतो. आमच्या निवारा गृहामध्ये वेगवेगळ्या जातींचे 250 हून अधिक कुत्रे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या संकटातून जात आहेत. कोणाचे पाय मोडले आहेत, कोणाचे डोळे गेले आहेत. अनेकांना मानसिक त्रास होतो. अश्या सर्वांचा आम्ही सांभाळ करतो.
लाडक्या म्हशीचं हुबेहूब चित्र काढलं, पण दुर्देवानं तिलाच नाही ते पाहता आलं!
कुत्र्यांचा उचलू शकता आर्थिक खर्च
स्मिता यांच्या संस्थेला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत नाही, त्यामुळे वर्चुअल एडॉप्शन हा प्रत्येकासाठी उपलब्ध पर्याय आहे. येथून तुम्ही अक्षरशः कोणताही कुत्रा पाळू शकता आणि त्याचा आर्थिक खर्च उचलू शकता. याशिवाय ग्रुप दत्तक हा देखील एक पर्याय आहे, ज्यामध्ये विद्यार्थी किंवा समाजाचा कोणताही त्यांच्या जवळच्या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन मदत करू शकतो.