मिळालेल्या माहितीनुसार, गवंडी काम करणाऱ्या मोहम्मद आमीरला बायकोपासून दोन मुली होत्या. पण बायकोचा मुलासाठी फार हट्ट होता. गेल्या दोन महिन्यापासून आमीरची बायको त्याला मुलगा पाहिजे म्हणुन त्रास देत होती.त्यामुळे आमीरने आपल्या सराईत गुन्हेगार मित्रासह मुलाचा शोध सूरू केला होता.त्यानुसार रविवारी सायंकाळी 4 वाजता पीर बुरहान नगर येथील मस्जिदी बाहेर मुलगा त्यांना दिसला होता. त्यानंतर या दोघांनी त्या मुलाच्या आईची नजर चूकवत मुलाला किडनॅप केले होते.त्यानंतर पल्सर बाईकवरून दोघेही मुलासह पसार झाले होते.
advertisement
या प्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांकडे धाव घेऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा तपास सूरू केला होता.या तपासा दरम्यान महिलेने पिर बुरहान नगर येथील एका मस्जिदी बाहेरून मुलगा गायब झाल्याची माहिती दिली होती.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि भाग्यनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि पल्सवर गाडीवरून मुलाचं अपहरण करणाऱ्या दोघांना अटक केली. यावेळी दोघांकडून बाळाचीही सूखरूप सूटका करण्यात आली होती.
मोहम्मद अमीर आणि त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल असे या दोन आरोपींची नावं होती.यातला मोहम्मद आमीर हा गवंडी काम करतो तर त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल हा सराईत गुन्हेगार आहे.हे दोघे नांदेड शहरातील खुदबई नगर येथील रहिवाशी आहेत.तसेच या घटनेनंतर महिलेला तिला मुलगा परत करण्यात आला आहे.
ही महिला एक भिकारी होती.मस्जिद बाहेर ती आपल्या मुलासह भीक मागायची.मित्र ईस्माईलने ही गोष्ट पाहताच तातडीने आमीर याला बोलावून घेतले. दोघेही आठ वाजेपर्यंत मस्जिदी जवळ थांबले.आठ वाजता नमाज झाल्यानंतर ती महिला भीक मागण्यात व्यस्त होती. त्याचाच फायदा घेत या दोघांनी दीड वर्षीय शेख अरमान याचे अपहरण केले होते.या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्यामुळे पोलिसांनी या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत या प्रकरणाचा तातडीने तपास केल्या बद्दल पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी भाग्यनगर पोलिसांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
