वेळापत्रक जाणून घ्या
नांदेड - हडपसर विशेष गाडी गाडी क्रमांक 07607 साप्ताहिक विशेष गाडी 21 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 08:30 मिनिटाला नांदेडहून निघणार आणि त्याच दिवशी रात्री 09:40 मिनिटाला हडपसरला पोहोचणार आहे. तर या गाडीचे एकूण 2 फेऱ्या होणार आहे. तर उलट दिशेने साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 07608 21ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10:40 मिनिटाला निघणार आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 मिनिटाला नांदेडला पोहोचणार असून या साप्ताहिक विशेष गाडीचे एकूण 2 फेऱ्या होणार आहे.
advertisement
असे असणार विशेष गाडीला थांबे
नांदेड - हडपसर या विशेष गाडीला पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर, लातूर रोड, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, आणि दौंड असे या गाडीला थांबे असणार आहे. गाडीची रचना 1 फर्स्ट एसी, 2एसी-II टियर, 6 एसी-III टियर, 1एसी हॉट बुफे कार, 6 स्लीपर क्लास, 4जनरल सेकंड क्लास आणि 2 लगेज कम ब्रेक व्हॅन. (22 कोच) प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घेत वैद्य तिकिटासह प्रवास करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
