उपवासासाठी भगर खाल्याने विषबाधेच्या घडत आहेत. नांदेड जिल्ह्यात हदगाव आणि मुदखेड तालुक्यात गेल्या दोन दिवसात भगर खाल्याने विषबाधेच्या घटना घडल्या. हदगाव तालुक्यातील दहा ते बारा गावातील नागरिकांना भगरमधून विषबाधा झाली. जवळ पास 60 ते 70 जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .
फळं की फळांचा ज्यूस, आरोग्यासाठी जास्त काय फायदेशीर?
advertisement
सध्या एकादशी आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागरिक हे मोठ्या संख्येने उपवास धरत असतात त्यामध्ये भगर हा उपवासाचा पदार्थ खातात. काल एकादशीनिमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्याचं सेवन केलं पण काहींना रात्री तर काहींना पहाटे उलट्या, मळमळ असा त्रास सूरु झाला. मोठया संख्येने नागरिक बाधित झाले.विषबाधा झालेल्या नागरिकांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालय तसेच काहींनी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
उद्या महाशिवरात्री आहे मोठया प्रमाणात नागरिक उपवास करतात. मात्र उपवासासाठी भगर खाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.
भगरीवर मोठया प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फ्युमीगाक्लेवीन सारखी विषद्रव्ये तयार होतात. वाढत्या तापमानामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाल्याने विषबाधेची शक्यता असते त्यामुळे भगर सेवन करु नये असे आवाहन करण्यात आलं आहे.