खासदार हेमंत पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, घडलं ते दुर्दैवी होतं पण न्यायालय यासंदर्भात ठरवेल. न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगेन. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून जामीन घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मी माझ्या राजकीय आयुष्यात माणूस महत्त्वाचा मानला आहे. कोणाला जात विचारली नाही. लोकसेवक म्हणून मी तिथे घटनेनंतर भेटायला गेलो. त्यांचे स्वत:चे शौचालय घाण असेल, कुलुप लावलेलं होतं. मी स्वत: साफ करतो म्हणलं. त्याच्याही व्हिडीओ क्लीप आहेत असंही हेमंत पाटील यांनी सांगितले.
advertisement
घटनेचं राजकीय भांडवल करायचं असेल तर लोकप्रतिनिधीनी बोलायचं नाही का? अधिकारी कोणत्या जातीचा आहे हे पाहून बोलायचं का? इतक्या लोकांचे मृत्यू होत असताना त्यांचा सत्कार करायचा का? असे प्रश्न हेमंत पाटील यांनी विचारले. जाब विचारणं गुन्हा असेल तर न्यायालय जी शिक्षा करेल ती मान्य करेन. मी जामीन घेणार नाही, शिक्षा भोगायला तयार आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधीवर असे गुन्हे दाखल होत असतील तर नोकरशाही बेलगामपणे काम करतील. यापुढे कुणीही लोकप्रतिनिधी कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना काहीच बोलणार नाहीत. जी काही शिक्षा होईल ती भोगायला तयार आहे. मी कोणत्याही प्रकारे जातीवाचक बोललो नाही. शिवीगाळ केली नाही. मी त्यांना अरेतुरे किंवा अपमानास्पद बोललो नाही. मी त्यांच्या शौचालयाची स्वच्छता करून घेत असले आणि गुन्हा दाखल होत असेल तर होऊदे असंही खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं.