TRENDING:

Vande Bharat: नांदेड ते मुंबई अवघ्या 9 तासात, वंदे भारतचा मुहूर्त ठरला! वाचा ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Vande Bharat: मुंबई ते जालना वंदे एक्स्प्रेस नांदेडपर्यंत चावलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. आता ही ट्रेन कधी सुरू होणार याबाबत अपडेट आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना चालणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ही रेल्वे नांदेड वरून कधी सुटणार याबाबत अनिश्चितता होती. ही अनिश्चितता आता दूर झाली असून 26 ऑगस्ट हा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. राज्यसभेचे खासदार आणि भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटर भरून यासंबंधीची आनंदवारता शेअर केली आहे. सकाळी पाच वाजता ही ट्रेन नांदेड इथून मुंबईसाठी रवाना होणार आहे.
Vande Bharat: नांदेड ते मुंबई अवघ्या 9 तासात, वंदे भारतचा मुहूर्त ठरला! पाहा ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक
Vande Bharat: नांदेड ते मुंबई अवघ्या 9 तासात, वंदे भारतचा मुहूर्त ठरला! पाहा ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक
advertisement

स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ

परभणी - पहाटे 5.40 वाजता/ पहाटे 5.42 वाजता

जालना - सकाळी 7.20 वाजता / सकाळी 7.22 वाजता

छत्रपती संभाजीनगर- सकाळी 8.13 वाजता / पहाटे 8.15 वाजता

अंकाई - सकाळी 9.40 वाजता/ 9.42

मनमाड - सकाळी 9.58 वाजता / सकाळी 10.03 वाजता

नाशिक रोड - सकाळी 11 वाजता / सकाळी 11.02 वाजता

advertisement

कल्याण - दुपारी 1 वाजून 20 मिनिटे / दुपारी 1.22 वाजता

ठाणे - दुपारी 1.40 वाजता/ दुपारी 1.42 वाजता

दादर - दुपारी 2.10 वाजता / दुपारी 2.12 वाजता

सीएसएमटी येथे दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20706 गुरुवार वगळता दररोज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघेल.

advertisement

स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ

दादर - दुपारी 1.17 वाजता / दुपारी 1.19 वाजता

ठाणे - दुपारी 1.40 वाजता / दुपारी 1.42 वाजता

कल्याण - दुपारी 2.04 वाजता / दुपारी 2.06 वाजता

नाशिक रोड - दुपारी 4.18 वाजता / दुपारी 4.20

मनमाड - सायंकाळी 5.18 वाजता / सायंकाळी 5.20 वाजता

advertisement

अंकाई - सायंकाळी 5.50 वाजता / सायंकाळी 5.52 वाजता

छत्रपती संभाजीनगर - सायंकाळी 7.05 वाजता / सायंकाळी 7.10 वाजता

जालना - रात्री 8.05 वाजता / 8.07 वाजता

परभणी - रात्री 9.43 वाजता / रात्री 9.45 वाजता

नांदेड येथे रात्री दहा वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी-हायस्पीड ट्रेन असून, ती 160 किमी/तास वेगाने धावते. यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास कोच उपलब्ध आहेत, जे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह आरामदायक प्रवास देतात. सीसीटीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे आणि वैक्यूम टॉयलेट्स यांसारख्या सुविधांमुळे ही ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटचा वापर करता येईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Vande Bharat: नांदेड ते मुंबई अवघ्या 9 तासात, वंदे भारतचा मुहूर्त ठरला! वाचा ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल