नेमकं घडलं काय होत?
आंजनी येथील गणपत गंगाराम धानेकर (वय 52) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
मुलाच्या दुःखाने आईचाही मृत्यू
मात्र,मुलाच्या निधनाचा धक्का 85 वर्षीय आई रतनबाई गंगाराम धानेकर यांना सहन झाला नाही. दुसऱ्याच दिवशी 3 नोव्हेंबरच्या सकाळी, रोजच्या प्रमाणे दूध देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रतनबाई यांचा अचानक मृत्यू झाला. या घटनेने गावात पुन्हा एकदा शोककळा पसरली.
सोमवारी दुपारी चार वाजता रतनबाई यांच्यावरही आंजनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी आणि नातू असा परिवार आहे. गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त केली असून आई–मुलाच्या सलग मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात वातावरण शोकमग्न झाले आहे.
