TRENDING:

Narhari Zirwal : मुलगा म्हणतो छाती फाडली तर शरद पवार दिसतील, वडील म्हणतात शरद पवारांचा मला दुरुन आशीर्वाद, झिरवाळांच्या मनात चाललंय तरी काय?

Last Updated:

MH Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते नरहरी झिरवाळ ही देखील आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच त्यांनी मोठं विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलेले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज अनेक पक्षातील नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते नरहरी झिरवाळ ही देखील आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच त्यांनी मोठं विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
झिरवाळांच्या मनात चाललंय तरी काय?
झिरवाळांच्या मनात चाललंय तरी काय?
advertisement

शरद पवारांचा दुरून आशीर्वाद 

माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, '' राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जरी दोन गट असले तरी शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद आहे. धनराज महाले उमेदवारी अर्ज मागे घेतील याबद्दल मला विश्वास आहे. मी त्यांना या संदर्भातील विनंती करणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर जनता मला निवडणून देईल. आणि मी 100 टक्के निवडून येणार'' असा झिरवाळ यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पार पडलेल्या शरद पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी माझी छाती फाडली तरी शरद पवार दिसतील असं वक्तव्य केलं होतं. तेव्हा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. यावर बोलताना नरहरी झिरवाळ सुरवातीला मी त्याला पाठवले नव्हते असे म्हणाले. नंतर काही दिवसांनी मीच गोकुळला पाठवले असे विधान केले. तेव्हापासून झिरवाळ यांची शरद पवार गटात घरवापसी होणार अशी चर्चा सुरू होती. अशातच आज पुन्हा एकदा झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवीन चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

दरम्यान, मागील काही दिवसांपासून दिंडोरी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलेला आहे. शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हि जागा शिंदे गटासाठी सोडण्यात यावी अशी मागणी धनराज महाले यांनी केली होती. या संदर्भात महाले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. परंतु ती जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली. यावर नाराज होऊन महाले यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Narhari Zirwal : मुलगा म्हणतो छाती फाडली तर शरद पवार दिसतील, वडील म्हणतात शरद पवारांचा मला दुरुन आशीर्वाद, झिरवाळांच्या मनात चाललंय तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल