मिळालेल्या माहितीनुसार, पिडित महिला आणि तिची 2 वर्षीय लेक घरात होते. या दरम्यान दुपारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा घरात शिरला आणि त्याने पहिल्यांदा विवाहितेच्या 2 वर्षीय लेकीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान मुलीच्या आईला ही घटना पाहताच तिने तत्काळ त्याला विरोध केला. पण महिलेच्या या विरोधाला न जुमानता अल्पवयीन मुलाने तिच्यावर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जमावातील महिलांनी केला आहे.
advertisement
दरम्यान महिलेने या घटनेनंतर आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. तसेच या घटनेनंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पकडून सोडून दिल्याचा आरोप करत आता संपूर्ण जमावाने मुंबई नाका पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे.त्यामुळे मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली आहे.तसेच या जमावाने आरोपीवर मुलावर कठोरता कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवू नका,असे आवाहन केले आहे. तसेच जमावाने जो आरोप केला तसा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे.त्याचीही खात्री आम्ही करत आहोत.तसेच त्या संदर्भात काय घटना घडली आहे,याची माहिती देखील आम्ही घेत आहोत. आणि अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणि या घटनेचा तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून सूरू आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
