चिठ्ठी लिहून भावाला विनंती
नेहाने लिहिलेल्या सुसाइड नोटमधील प्रत्येक ओळ त्यांच्या वेदना आणि जगण्यासाठीची धडपड दाखवते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी तिने ही चिठ्ठी माहेरच्यांना पाठवताना कळकळीची विनंती केली होती. मी लिहिलेली चिठ्ठी सासरच्या लोकांना सापडली तर ते पुरावे नष्ट करतील माझा छळ करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो मी तुम्हाला पाठवत आहे. रोज थोडे थोडे मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे. सासरच्यांनी तिच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नसावा असं हे चिठ्ठी वाचून तरी वाटत आहे.
advertisement
मानसिक छळ, अत्याचार आणि हुंड्यासाठी दबाव
नेहाचं लग्न जूनमध्ये 15 लाख रुपये खर्च करुन झालं. लग्नानंतर काही दिवसांतच वेगवेगळ्या पद्धतीनं मानसिक छळ सुरू झाला. नणंद सासू आणि नवऱ्याचे कान भरायची. सगळं करुनही काहीच काम करत नाही, नुसती मोबाईलवर बोलते असे सारखे टोमणे मारायची, काहीही हवं असेल तर तुझ्या माहेरातून आण, पैसे घेऊन ये असा तगादा लावला जात होता. लग्नात परंपरेनुसार आणि नवरदेवाच्या मागणीनुसार सोनं नाणं घाला असं सांगितलं.
पतीकडून दोन महिने सतत चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला जात होता. कौमार्य चाचणीत यशस्वी न झाल्याने पुन्हा छळ सुरू झाला. तुझं माहेरी कुणीतरी ठेवलेला आहे असे आरोप करण्यात आले. कौमार्य चाचणी यशस्वी झाल्यानंतर पतीनं चारित्र्यावर संशय घेणं कमी केलं. माहेरी आल्यावरही जास्त दिवस राहायचं नाही राहिलं तर ते माहेरच्या लोकांना उलट सुलट सांगून त्यांचे कान भरायचे, धमकी द्यायचे. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने अखेर चिठ्ठीत लिहिलं आहे रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी एकदाच विष खाऊन झोपते. यावरुन लक्षात येईल तिचा किती भयंकर छळ होत होता.
सासरच्या जाचाला कंटाळून तिने अखेर आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आधी गौरी आणि आता नाशिकची ही नेहा. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सात पानांची ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.
