TRENDING:

Nashik Police News: नाशिक पोलीस दलात मोठे फेरबदल, निवडणुकीच्या तोंडावर डझनभर अधिकाऱ्यांच्या बदल्या

Last Updated:

आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिक पोलीस (Nashik Police) दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस दलातील तब्बल 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात खांदे पलट करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी पोलिसांच्या बदल्या झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Police
Maharashtra Police
advertisement

आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिस दलात फेरबदल केल्याची माहिती आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा निर्णय घेतला आहे

कोणाची बदली कुठे करण्यात आली?

advertisement

  1. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात
  2. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची अंबड पोलीस ठाण्यात
  3. अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात
  4. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची सातपूर पोलीस ठाण्यात
  5. advertisement

  6. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची आडगाव पोलीस ठाण्यात
  7. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांची एमआयडीसी उंचाळे पोलीस ठाण्यात
  8. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे यांची विशेष शाखेत
  9. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिसे यांची सायबर पोलीस ठाण्यात
  10. एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची मुंबई नाका पोलीस ठाण्यात
  11. advertisement

  12. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा युनिट एक
  13. शहर वाहतूक शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार आढवू यांची सातपूर पोलीस ठाण्यात
  14. शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट

येथे बदली करण्यात आली आहे.

advertisement

बदली सत्रामुळे पोलीस दलात खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत करा घरीच बिझनेस, 30 रुपयांना घ्या अन् 50 ला विका! ठाण्यात इथं करा खरेदी
सर्व पहा

नाशिकच्या अंबड, गंगापूर, सातपूर, आडगाव, इंदिरानगर, भद्रकाली, सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर डझनभर अधिकाऱ्यांच्या बदली सत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Police News: नाशिक पोलीस दलात मोठे फेरबदल, निवडणुकीच्या तोंडावर डझनभर अधिकाऱ्यांच्या बदल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल