सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेचा साथीदार प्रिन्स सिंग गुन्हा दाखल असल्यापासून फरार होता. तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने शोध घेऊन नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक केली. आरोपी हे ट्रांजिट रिमांडमध्ये असून नाशिकमध्ये पोहोचतील. तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. आम्हीही त्याचा शोध घेत होतो. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
advertisement
आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्यावर त्याने दुसरा मजल्यावरील छतावरून उडी मारली. त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. तिकडे उपचार करून डॉक्टरांनी आरोपीला डिस्चार्ज दिला आहे. आरोपी प्रिन्स सध्या रिमांडमध्ये आहे. दरम्यान भूषण लोंढेकडे प्रिन्सबाबत चौकशी होईल. पोलिसांच्या चौकशीत नवी माहिती समोर येऊ शकते.
नाशिक सातपूरमध्ये लोंढे गँगची मोठी दहशत
सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. त्याच आरोपींचा माज नाशिक पोलिसांनी मोडला.
आरोपी लोंढेच्या ऑफिसमध्ये भुयारी खोली
नाशिक पोलिसांनी गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या घर झडतीत पोलिसांना त्याच्या कार्यालयात भुयारी घर सापडून आले होते. पोलिसांनी भुयारी घराची झाडाझडती घेतली.
