TRENDING:

लग्नाला 6 महिनेही झाले नाहीत, नवववधून 7 पानांची चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य, नाशिक हादरलं!

Last Updated:

नेहा पवार हिने नाशिकच्या हिरावाडी येथे सासरच्या मानसिक त्रास, हुंडा आणि अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: लग्नाला अवघे सहा महिनेही पूर्ण झाले नाहीत, हातावरची हळद उतरली आणि मेहंदी गेली तसे सासरचे खरे रंग दाखवायला सुरुवात झाले. नव्या नवरीची स्वप्न असतात ती स्वप्न पाहाणं तर दूरच पण रोजच्या जाचाला कंटाळून मन मारुन राहायची वेळ या तरुणीवर आली. अखेर तिने मानसिक त्रास, हुंडा आणि अत्याचाराला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. हे करण्याआधी तिने सात पानांची चिठ्ठी लिहून आपलं आयुष्य संपवलं. सात पानांच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं आहे ते मन हेलावून टाकणारं आहे.
News18
News18
advertisement

जूनमध्ये लग्न झालं, नवलाईचे दिवस संपले तसे सासरच्यांनी हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. माहेरुन पैसे आणण्याची मागणी करु लागली. नवऱ्याचे लग्नाआधी एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्याचे अश्लील फोटो दाखवून मानसिक त्रास देऊ लागला. चारित्र्यावर संशय, मानसिक त्रास, लैंगिक अत्याचाराला कंटाळून या नववधूनं टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रासाला कंटाळून नेहा पवार या नवविवाहितेने लग्नानंतर ६ महिन्यातच संपवलं जीवन.

advertisement

एक नणंद माहेरी येऊन बसली आहे. तिच्यासह तिच्या मुलांचंही करावं लागतं, नंदा नवरा आणि सासूचे कान भरतात, त्यावरुन घरात मानसिक छळ केला जात असल्याचंही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ती काहीच काम करत नाही, सतत मोबईलवर असते, माहेरच्यांशी सारखी गप्पा मारत असते असे कान भरतात. माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली. 15 लाख रुपये देऊन माझ्या भावाने लग्न लावलं, माझ्या नवऱ्याची परिस्थिती खराब आहे असं दाखवण्यात आलं, म्हणून मी माझ्या माहेरातून 20 हजार रुपये मदत आणून दिली. ते दिले नसते तर त्यांनी अजून छळ केला असता अशी भीती सतत मनात होती.

advertisement

माझ्या घरच्यांनाही माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. नांदायला आल्यापासून नवऱ्याने दोन वेळा मारलं. आईवरुन शिवीगाळ करतो. इतकंच नाही तर माहेरी तुझा कोणी यार ठेवला असेल असे सतत बोलून चारित्र्यावर संशय घेत होता असंही नवविवाहितेनं म्हटलं आहे. अंगावर काटा आणणारी ही चिठ्ठी आहे. ही चिठ्ठी सासरच्यांच्या हाती लागली तर पुरावे नष्ट करतील म्हणून विवाहितेनं चिठ्ठी लिहून त्याचे फोटो भावाला पाठवले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

पोलिस आणि भावाच्या नावे सुसाइड नोट लिहून आयुष्य संपवलं आहे. विवाहितेच्या सुसाइड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संपूर्ण कुटुंबाची चौकशी सुरू आहे. नाशिकच्या हिरावाडी परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस आता सासू आणि नवऱ्याची चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नाला 6 महिनेही झाले नाहीत, नवववधून 7 पानांची चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य, नाशिक हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल