नेमकं काय म्हणाले भुजबळ?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व पूर्ण शक्तीने उतरणार आहोत. दोन तारखेला अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. तोपर्यंत एक दोन दिवसांत कदाचित नाशिकचा उमेदवार देखील जाहीर होईल. आम्ही पूर्ण ताकदीने दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत.
advertisement
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेमध्ये सोमवारी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवार यांचं नाव न घेता, 'भटकती आत्मा गेल्या 45 वर्षांपासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी कार्यरत असल्याची’ टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावर आता छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पवार मोदींवर टीका करतात तर मोदी हे देखील त्यांच्यावर टीका करणारच असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
