नाशिक : सध्या सर्वत्र उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेश उत्सवासाठी बाहेर गावातील अनेक नागरिक बाप्पाच्या आगमांसाठी आपली आपल्या गावी जात असतात. दरम्यान, अनेक भाविक नाशिकहुन सोलापूर, अमरावती, नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी दर्शनाला जात असतात. यावेळी अनेक भाविक हे गणेशाच्या दर्शनाला जाण्याच्या विचारात असतील. मात्र, त्यांनी या प्रवासादरम्यान, ट्रॅव्हल्सचे दर नेमके किती आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
गणेशोत्सवादरम्यान, खासगी प्रवासी गाड्यांचे आणि ट्रॅव्हल्सचे दर वाढविण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी अनेक महामंडळाच्या गाड्या या कोकणात गेल्या आहेत. याचाच फायदा अनेक ट्रॅव्हल्स कंपनी घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हलचे तिकिट दर हे वाढले आहेत.
तिकिटाचे दर वाढले असले तरी या मार्गावर प्रवासाची संख्या लक्षणीय आहे. नाशिकहून पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी जाणारे चाकरमानी प्रवासी हे जास्त आहेत. बरेच भक्त बाप्पाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीच गावी जाण्यासाठी निघत असतात. यामुळे या काळात ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अधिक मागणी असते.
Ganeshotsav Pune : तुळशीबाग मंडळाचा उपक्रम, यंदाच्या वर्षी तयार केला जगन्नाथ पुरीचा देखावा, VIDEO
खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर प्रवासी वाहतूक करण्यासाठी खासगी वाहतुकीचे दर प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे निश्चित केले जातात. खासगी ट्रॅव्हल्सला टप्पा वाहतुकीसाठी बंदी असल्याने सरकारी दाराच्या जास्त दीडपट भाडे आकारण्याची परवानगी आहे. मात्र, ट्रॅव्हल्स कंपन्या अव्वाच्या सव्वा भाडे आकारताना दिसत आहेत.
असे आहेत खासगी ट्रॅव्हल्सचे आत्ताचे दर -
- नाशिक-पुणे 1000 ते 1300
- नाशिक-मुंबई 800 ते 100
- नाशिक-सोलापूर 900 ते 1400
- नाशिक-कोल्हापूर 900 ते 1700
- कोल्हापूर-नागपूर 1000 ते 1600