‘मास्टरमाईंड’ कोण?
नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील या अधिकाऱ्याला ठाण्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिलेच्या मदतीने नाशिकमधील एका राजकीय कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात अडकवल्याच तपासात समोर आलं आहे. अशातच या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ कोण? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
मास्टरमाईंड नाशिकचाच...
राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर, या ट्रॅपचा ‘मास्टरमाईंड’ हा नाशिकचाच असल्याचे समोर येत असून, तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतची वाच्यता केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.
अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता
हा प्रकार ज्या हॉटेलमध्ये घडला, त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. यातून प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. या हनी ट्रॅप प्रकरणाच्या पुन्हा सुरू झालेल्या गोपनीय तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची वाच्यता होताच, राज्यातील अनेक अधिकारी समोर आले आहेत. यात महसूल विभागातील सर्वाधिक अधिकारी गुंतल्याची माहिती मिळत आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढलं आहे.