नाशिकरोड परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. जय भवानी रोड परिसरात असलेल्या मनोहर गार्डनमधील एका बंगल्यात हा बिबट्या घुसला. बंगल्यातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या परिसरात पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. महिनाभरानंतर या परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली आहे.
advertisement
बापरे! थेट अजगरासोबत भिडला तरुण; सापाने हाताला वेढा घातला अन्.., थरकाप उडवणारा VIDEO
नाशिक रोड परिसराला लागूनच लष्कराचं आर्टिलरी सेंटर आहे. या ठिकाणी घनदाट जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे भक्ष आणि पाण्याच्या शोधात बिबट्या कधीकधी बाहेर येतात. काही भेटलं नाही तर परत निघून जातात. परंतु काही दिवसांपासून शहरात नागरी वस्तीत बिबट्या वावरत असल्याने नागरिक भीतीच्या सावटात राहत आहेत.
कधीकाळी जंगलांमध्ये वास्तव्य करणारे बिबटे आता मानवी वसाहतीत शिरत असल्याने नाशिक शहराची ओळख लेपर्ड सिटी म्हणून होते आहे.