सिमेंट घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली. मुंबई-आग्रा महामार्गांवर चांदवडच्या वडाळीभोई उड्डाणं पुलावर ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर टोल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यत ट्रक जळून खाक झाला होता.
चालक आणि क्लीनर वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला असून या घटनेमुळे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2024 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत पूर्ण ट्रक जळून खाक