बदललेल्या वेळा खालीलप्रमाणे:
सकाळ सत्र: शहरातील सर्व महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी प्राथमिक शाळा आता सकाळी 7:30 ऐवजी 8:00 वाजता सुरू होतील आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत चालतील.
दोन सत्रांत भरणाऱ्या शाळा: ज्या शाळा दोन सत्रांत भरतात, त्यांच्या सकाळच्या सत्राची वेळ आता सकाळी 8:00 ते दुपारी 12:00 अशी असेल.
दुपारचे सत्र : दुपारच्या सत्राच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे सत्र पूर्वीप्रमाणेच 12:20 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत सुरू राहील.
advertisement
Weather Alert: हलक्यात घेऊ नका! पुणे ते नागपूर 13 जिल्ह्यांवर संकट, शुक्रवारी IMD चा अलर्ट
या बदललेल्या वेळेनुसार, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या किमान अर्धा तास पूर्वी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर खासगी प्राथमिक शाळांना त्यांच्या स्तरावर, विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन, शाळेच्या वेळेबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी ही माहिती दिली असून, पालकांनी व शाळा प्रशासनाने याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






