पाणीपुरवठा बंद राहण्याचे मुख्य कारण
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शहरात विविध ठिकाणी नवीन 'फ्लोमीटर' बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. याचसोबत शहरातील मुख्य जलवाहिन्यांची गळती रोखणे, व्हॉल्व्ह दुरुस्त करणे आणि नवीन जलकुंभांच्या जोडणीची (क्रॉस कनेक्शन) कामे एकाच वेळी केली जाणार आहेत.
विभागांनुसार होणारी महत्त्वाची कामे
नाशिक पूर्व विभाग: द्वारका आणि गोडेबाबा जलकुंभाच्या गुरुत्ववाहिनीवर बँड बसवणे, सुचित्ता नगर आणि गांधीनगर भागात एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती आणि जलवाहिनीवरील गळती काढण्याचे काम केले जाईल.
advertisement
नाशिकरोड विभाग: मुक्तीधाम जवळील कुलकर्णी पंपाच्या जलवाहिनीची मोठी गळती काढणे, स्मार्ट सिटी अंतर्गत मुक्तीधाम आणि दुर्गा जलकुंभ येथे नवीन इनलेट-आउटलेट व्हॉल्व्ह व फ्लोमीटर बसवण्याचे काम होईल.
पंचवटी विभाग: पेठ रोड, मखमलाबाद आणि तवली डोंगर भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. तसेच निलगिरी बाग व नवीन जलकुंभांच्या मुख्य वितरण वाहिन्यांची जोडणी करणे.
सातपूर विभाग: अंबड लिंक रोड परिसरात नवीन ५०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन टाकणे आणि चुंचाळे शिवार भागात जलवाहिनीची गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
नागरिकांसाठी सूचना
शनिवारी दिवसभर काम चालणार असल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. रविवारी पाणीपुरवठा पूर्ववत होईल, मात्र जलवाहिन्यांमध्ये हवेचा दाब असल्याने पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.






