नाशिक : अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होतो. अनेकदा तर या अॅसिडिटीचा त्रास अनेकांना असह्य असा होतो. त्यामुळे ही अॅसिडिटी नेमकी कशी होते, यावर काय उपाय आहे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. डॉ. जितेश पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी असे म्हणतात. सामान्यत: आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो, जो अन्न पचवण्याचे व ते तोडण्याचे कार्य करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ होणे अशी लक्षणे दिसून येतात.
advertisement
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि खराब जीवनशैली यामुळे ॲसिडिटी होते. त्याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या किंवा अति तेलकट व तिखट पदार्थ खाणाऱ्यानाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काही औषधांनी ॲसिडिटीचा कमी होऊ शकतो. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
गुजरातच्या गवतामुळे वाढले दुधाचे उत्पन्न, सोलापूरचा शेतकरी कमावतोय महिन्याला दीड लाख रुपये, VIDEO
काय आहेत ॲसिडिटीची लक्षणे?
पोटात जळजळ होणे, घशात जळजळणे, अस्वस्थ वाटणे, आंबट ढेकर येत राहणे, तोंडाची चव जाणे, बद्धोष्ठतेचा त्रास होणे.
कशामुळे होतो ॲसिडिटी?
सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे, धूम्रपान व मद्यपान करणे, ताणतणाव, पोटाचे आजार
मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO
कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ?
– मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.
– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.
– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.
– अन्न चावून चावून सावकाश खावे.
– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.
– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
– गरज नसताना औषधे घेणे टाळावे.
सूचना - वर दिलेली माहिती ही डॉक्टरांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कुठलाही दावा करत नाही. ही माहिती सामान्य असून वैयक्तिक सल्ला नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.