TRENDING:

Water Supply Nashik : नाशिककरांनो, पाणी जपून वापरा, शनिवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Last Updated:

शनिवारी सिडको, नाशिक रोड, पूर्व विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दिनांक 09 नोव्हेंबर, रविवार रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिक महावितरण तर्फे विद्युत पुरवठा काही कालावधीसाठी बंद करण्यात येणार असल्याने नाशिक मुकणे डॅम रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा सदर कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे दिनांक 08 नोव्हेंबर, शनिवारी सिडको, नाशिक रोड, पूर्व विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दिनांक 09 नोव्हेंबर, रविवार रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जाहीर सूचना शनिवारी राहणार नाशिक मधील काही भागातील पाणी बंद.
जाहीर सूचना शनिवारी राहणार नाशिक मधील काही भागातील पाणी बंद.
advertisement

महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे शनिवारी सकाळी 10 ते दिनांक 04 वाजेदरम्यान ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि चाचणीकामी विद्युत पुरवठा काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर या कालावधीत विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे सदर जलशुद्धीकरण केंद्र येथून शहरातील सिडको आणि नाशिक पूर्व भागास पाणीपुरवठा होणार नसल्याची सूचना विभागामार्फत जारी करण्यात येत आहे.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, शुक्रवारी दुहेरी संकट, हवामान विभागाचा अलर्ट

सिडको: प्रभाग क्र. 24, प्रभाग क्र. 25, प्रभाग क्र. 26, प्रभाग क्र. 27, प्रभाग क्र. 28, प्रभाग क्र. 29, प्रभाग क्र. 30, पूर्ण पाणीपुरवठा होणार नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

तसेच नाशिक रोड: प्रभाग क्र. 22 मधील वडनेर गेट, पंपिंगपर्यंत व रेंज रोड या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. याचबरोबर नाशिक पूर्व विभाग: नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्र. 14, प्रभाग क्र. 23, प्रभाग क्र. 30 पूर्ण या भागातही काही कालावधीसाठी पाणी नसेल. याची नोंद विभागातील रहिवाश्यांनी घ्यावी व या सुधारणेच्या कालावधीत आपली गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Water Supply Nashik : नाशिककरांनो, पाणी जपून वापरा, शनिवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल