नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढली. या निवडणुकीत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. मागच्या वर्षभरापासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. भाजपनं परवानगी दिल्यास एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार करणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी न्यूज 18 मराठीसोबत बोलताना दिली होती, त्यामुळे राजकारण तापलं होतं. शिंदेंनी माझ्या नादी लागू नये, हलक्यात घेऊ नका... शिंदेंनी स्वत:च्या गळ्याला फास लावून घेतला आहे. स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हानही गणेश नाईक यांनी शिंदेना दिलं होतं.
advertisement
याआधी गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांवर तर शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6 आणि अपक्ष 6 उमेदवार जिंकले होते.
