अशी एकूण स्थिती असताना आता नवी मुंबई महानगरपालिकेनं मात्र माजी नगरसेवकांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. महापालिकेने माजी नगरसेवकांची कोट्यवधी रुपयांची कामं मंजूर केली आहेत. एकीकडे शेतकरी वर्ग अद्याप मदतीसाठी आस लावून बसला नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नगरसेवकांची दिवाळी एकप्रकारे धडाक्यात साजरी झाली आहे.
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्णयामुळे माजी नगरसेवकांची दिवाळी गोड झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक माजी नगरसेवकांची दोन ते तीन कोटींची कामे मंजूर केली आहेत. यात भाजप नगरसेवकांची १२५ ते १५० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची २५० ते ३०० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
advertisement
दुसऱ्या बाजुला इतर सर्व पक्षांच्या माजी नगरसेवकांना देखील खूश करण्यात आलं आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना माजी नगरसेवकांसाठी कोट्यवधींची खैरात वाटल्याने या निर्णयाकडे राजकीय अंगाने बघितलं जात आहे.
