Diwali Tourism: सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?

Last Updated:

Diwali Tourism: दिवाळीच्या सुट्ट्यांत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तुम्ही देखील या एका दिवसाची ट्रिप प्लॅन करत असाल तर कल्याणमधील हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहेत.

+
सकाळी

सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?

कल्याण: कल्याण शहर हे ठाणे जिल्ह्यातील वसलेले असून मुंबई शहरापासून 44 किमी अंतरावर आहे. कल्याण हे ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून कल्याण-डोंबिवली अशी महापालिका आहे. कल्याणला समृद्ध ऐतिहासिक वारसा असून सध्याच्या काळातही पर्यटक आणि इतिहासप्रेमींना हा  इतिहास खुणावत असतो. तुम्ही देखील दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एका दिवसात जाऊन परत येण्यासाठी कल्याणमधील काही पर्यटनस्थळं माहिती असावीच. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणमून घेऊ.
दुर्गाडी किल्ला: किल्ल्याच्या प्रवेश मार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता. याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाते. दुर्गाडीच्या लहानशा किल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांची नेहमी गर्दी बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याण जिंकले. तेव्हा तिथे त्यांनी नौदलासाठी दुर्गाडी किल्ला बांधला. मंदिराजवळ गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहे.
advertisement
मेट्रो जंक्शन मॉल: कल्याणमधील मेट्रो जंक्शन मॉल हा ठाणे जिल्ह्यातील पहिला शॉपिंग मॉल आहे, जो कल्याण-शिळ रोडवर नेतिवली येथे आहे. या मॉलची स्थापना एप्रिल 2008 मध्ये झाली आणि याचे क्षेत्रफळ सुमारे 550,000 चौरस फूट आहे. येथे खरेदीसाठी अनेक दुकाने, फूड कोर्ट आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे हे कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर भागातील लोकांचं हे आवडीचं ठिकाण आहे.
advertisement
काळा तलाव: कल्याणमधील 'काळा तलाव' हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, ज्याला 'शेनाळे तलाव' असेही म्हणतात. हा कल्याणमधील पहिला आणि सर्वात जुने सार्वजनिक तलाव आहे, जो पर्यटकांसाठी बोटिंग, चालणे आणि पिकनिकसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. याचा इतिहास 18 व्या शतकापर्यंत जातो, जेव्हा आदिलशहाने हा तलाव बांधला होता.
बिर्ला मंदिर: शहाड येथून कल्याण मुरबाड रोडवर बिर्ला मंदिर आहे. बिर्ला मंदिर कल्याण स्टेशनपासून 4 किमी आणि शहाड पासून 1 किमी अंतरावर आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक ठिकाणांहून भाविक या मंदिराकडे दर्शनाला येत असतात.
advertisement
दरम्यान, कल्याणमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे असून दिवाळीच्या सुट्टीत एक-दोन दिवसांचा प्लॅन असेल तर या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/Travel/
Diwali Tourism: सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement