TRENDING:

Navi Mumbai News: पनवेलमध्ये छमछमवर छापेमारी, 20 जणांना ठोकल्या बेड्या

Last Updated:

Navi Mumbai News: पनवेलमधून मोठी बातमी समोर येत आहे. पनवेलजवळील नावडे गावामध्ये तळोजा पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा एका लेडिज बारवर छापा टाकला. जिथे काही दुष्कृत्य सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: पनवेलमधून मोठी बातमी समोर येत आहे. पनवेलजवळील नावडे गावामध्ये तळोजा पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा एका लेडिज बारवर छापा टाकला. जिथे काही दुष्कृत्य सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या बेकायदेशीर कृत्यांची पोलिसांना माहिती मिळाली. पोलि‍सांनी त्यानंतर लगेच धडाकेबाज कारवाई करत या दुष्कृत्याचा पर्दाफाश केला. यासाठी पोलि‍सांनी सापळा रचला. या माध्यमातून पोलि‍सांनी आरोपींना रंगेहात पकडलं.
News18
News18
advertisement

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हा बार अनुमतीने अनेक दिवसांपासून सुरू आहे. याठिकाणी अनेक तरूणींना नको त्या मार्गाला लावले जात होते. शिवाय, अश्लील कृत्ये करण्यासाठी तरूणींना बळजबरीने करायला भाग पाडलं जात होते. पोलिसांनी टाकलेल्या छापेमारीमध्ये एकूण 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई दरम्यान तब्बल 17 तरूणींना अश्लील कृत्य करताना पकडण्यात आले आहे. यावेळी अनेक महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यासमोर आक्षेपार्ह कृत्ये करत होत्या, त्याच दरम्यान पोलिसांनी छापेमारी टाकली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत करा घरीच बिझनेस, 30 रुपयांना घ्या अन् 50 ला विका! ठाण्यात इथं करा खरेदी
सर्व पहा

तळोजा पोलिसांनी रात्रीच्या सुमारास लेडिज रेस्टॉरंट अँड बारवर छापेमारी टाकली आहे. छापेमारीमध्ये पोलिसांनी कोणाकोणाला अटक केली आहे, याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही. छापेमारीदरम्यान पोलिसांनी एकूण 20 जणांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये मोठी कारवाई केली होती. एका लॉजमध्ये लॉजिंगच्या नावाने दुष्कृत्य सुरु होते. तिथे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित लॉजवर सापळा रचून आरोपींना पकडले होते. नवी मुंबई पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडून लॉजमध्ये रंगेहात पकडले होते. पोलिसांच्या थरारक कारवाईने अशाप्रकारे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai News: पनवेलमध्ये छमछमवर छापेमारी, 20 जणांना ठोकल्या बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल