पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचे ऐरोली सेक्टर ६ मध्ये स्वतःचे हॉस्पिटल आहे. याच रुग्णालयातील केबिनमध्ये आरोपीने मद्यधुंद अवस्थेत नात्यातील आते-बहीण असलेल्या महिलेला मारहाण करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.
या घटनेनंतर महिलेनं रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे, पंतप्रधानांचा कार्यक्रमाचा बंदोबस्तामुळे विलंब झाला असून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला व आरोप झालेला डॉक्टर हे दोघेही नातेवाईक आहेत. यामुळे सखोल चौकशी करत असल्याचं रबाळे पोलिसांनी म्हटले आहे.
advertisement
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 10, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टरकडून मामे बहिणीवर हल्ला आणि बलात्काराचा प्रयत्न, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार