देवीच्या मंदिराची आख्यायिका
असे मानले जाते की, पूर्वी देवी डोंगरावरच राहायची. एक वृद्ध धनगर दररोज डोंगरावर जाऊन तिची पूजा करत असे. उतारवयात त्याला डोंगरावर जाणे शक्य होईना. त्याने देवीला विनंती केली की, तिने डोंगरावरून खाली यावे. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि सांगितले की, "मी तुझ्या मागे येते, पण तू मागे वळून पाहू नकोस." देवीने शेळीचे रूप घेतले आणि पुजाऱ्याच्या मागे चालू लागली. पण काही अंतर गेल्यावर पुजाऱ्याने मागे वळून पाहिले आणि देवी त्याच ठिकाणी थांबली. तेव्हापासून तिचे मंदिर त्या डोंगरामध्ये आहे. विशेष म्हणजे, या देवीची मूर्ती किंवा छायाचित्र कुठेही पाहायला मिळत नाही, कारण असे केल्यास त्रास होतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.
advertisement
मंदिरातील प्रथा आणि परंपरा
- कौल लावण्याची पद्धत : देवीच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तांदळाचे दाणे चिकटवून कौल लावला जातो. उजव्या बाजूचे दाणे पडल्यास कौल सकारात्मक, तर डाव्या बाजूचे दाणे पडल्यास नकारात्मक मानले जाते.
- नऊ दिवसांचा उपवास : नवरात्रीमध्ये गावातील प्रत्येक घरातून किमान एक किंवा दोन व्यक्ती नऊ दिवस फक्त फळांवर उपवास करतात आणि मंदिरातच राहतात. या कठोर उपवासातून देवीची शक्ती मिळते, अशी त्यांची धारणा आहे.
- लग्न आणि नैवेद्य : गावात कोणतेही लग्न देवीला कौल लावल्याशिवाय होत नाही. तसेच, लग्नानंतर तीन वर्षांतून एकदा मुलीच्या नवऱ्याला भुजाईदेवीला बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागतो, अशी अनोखी परंपरा इथे आहे.
'गुळ' काढण्याची परंपरा
टिक्केवाडीचे ग्रामस्थ दर तीन वर्षांनी 'गुळ' काढतात. ही एक अनोखी प्रथा आहे. या काळात लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, वनौषधींचा शोध घेतात, आणि गावातील वाद मिटवून एकत्र येतात. 'गुळ' काढण्यासाठी कौल घेऊनच गावकरी जातात आणि परत येण्यासाठीही पुन्हा कौल घेतला जातो. या काळात घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे किंवा दिवा लावणे वर्ज्य असते. विशेष म्हणजे या काळात गावात चोरी होत नाही.
इतर वैशिष्ट्ये
- भीमाचा अंगठा : मंदिराच्या बाजूला जमिनीवर अंगठ्यासारखा एक मोठा ठसा आहे, ज्याला 'भीमाचा अंगठा' असे म्हणतात. पांडव इथे आले असताना भीमाने आपला अंगठा कापून टाकला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते.
- यात्रा : दसरा आणि माघ पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सव होतो. यात्रेत सनई-चौघड्यांच्या गजरात देवीची मिरवणूक निघते आणि सासनकाठ्या नाचविल्या जातात.
हे ही वाचा : नवरात्रीत कोल्हापूरला जाताय? फक्त अंबाबाईच नाही, तर 'ही' 7 प्राचीन मंदिरे तुमची यात्रा करतील पूर्ण, वाचा सर्व माहिती