TRENDING:

मुलांची भेट ठरली शेवटची, नागपुरात अजित पवार गटाच्या महिला नेत्याचा भीषण अपघात, जागीच मृत्यू

Last Updated:

गीता सुशील हिंगे यांचा गडचिरोली-नागपूर महामार्गावर अपघातात मृत्यू, पती सुशील हिंगे गंभीर जखमी, जिल्ह्यात शोककळा पसरली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या, आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता सुशील हिंगे (५३) यांचं गडचिरोली-नागपूर महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जागीच निधन झालं. या अपघातात त्यांचे पती सुशील हिंगे (५७) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. या दुःखद घटनेने गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
News18
News18
advertisement

नेमकी दुर्घटना कशी घडली?

गीता हिंगे आणि त्यांचे पती सुशील हिंगे हे रविवारी नागपूर येथील कामे आटोपल्यानंतर आपल्या मुलांना भेटले आणि रात्री उशिरा आपल्या चारचाकी वाहनाने गडचिरोलीकडे परत येत होते. रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गडचिरोली-नागपूर महामार्गावरील उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

पाचगावजवळून जात असताना, रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने आलेल्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या कारला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मागच्या सीटवर बसलेल्या गीताताई हिंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रावर बुधवारी कोल्ड वेव्हचं संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
सर्व पहा

या अपघातात पती सुशील हिंगे आणि कारचालक हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या गीता हिंगे यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलांची भेट ठरली शेवटची, नागपुरात अजित पवार गटाच्या महिला नेत्याचा भीषण अपघात, जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल