बीडच्या पीडित कुटुंबाला राष्ट्रवादीचे नेते मोहन जगताप शनिवारी भेटायला आले होते. त्यांनी कुटुंबाच्या समोर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेचा मास्टरमाइंड शोधण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिले.
'त्यांना' सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल
तसेच पीडितेच्या तक्रारीवर चौकशी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होईल आणि जे कोणी या प्रकरणात असेल त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणीस यांनी पीडित कुटुंबाला फोनवरून दिले.
advertisement
प्रशांत बनकर आणि पीडितेमध्ये जोरदार भांडण झाले होते
पीडित डॉक्टर महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरिष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने तळहातावर लिहिल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बदाने याने वारंवार अत्याचार केले आणि बनकर याने तिचा मानसिक छळ केला. प्रशांत बनकर आणि पीडितेची चांगली मैत्री होती. प्रशांतच्या वडिलांच्या फ्लॅटमध्येच पीडिता राहायला होती. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रशांत आणि पीडितेमध्ये जोरदार भांडण झाले होते.
आरोग्य विभागाचे आणि पोलिसांचे पथक दाखल फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल
फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाचे आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. डॉक्टर अंशुमन धुमाळ आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून परिचारिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. सातारा जिल्हा शल्य चिकित्सक देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
