TRENDING:

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी

Last Updated:

आतापर्यंत दोन याद्यांमध्ये ६८ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर आता ९ उमेदवार जाहीर केले. ७७ उमेदवारांपैकी ११ जागांवर महिला उमेदवार दिले असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिसरी यादी जाहीर केली. आतापर्यंत दोन याद्यांमध्ये ६८ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर आता ९ उमेदवार जाहीर केले. ७७ उमेदवारांपैकी ११ जागांवर महिला उमेदवार दिले असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. अणूशक्तीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिलीय.
News18
News18
advertisement

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना तिकिट दिलं नाही. याबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, नवाब मलिक यांनी त्यांच्या कन्येला निवडणूक लढवण्याची परवानगी दिलीय. तर नवाब मलिक यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनाच सोबत घेण्याची भाजपची तयारी दिसते.

स्वरा भास्करचा पती फहाद अहमद याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अनुशक्तीनगर मधून उमेदवारी दिली. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचा पदाधिकारी होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना आपल्या चिन्हावरून उमेदवारी दिली आहे. आता अनुशक्ती नगरचा सामना हा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा होणार आहे. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरूद्ध फहाद अहमद अशी लढत होईल.

advertisement

राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार

हिंगणा - रमेश बंग

अणूशक्तीनगर - फहाद अहमद

चिंचवड - राहुल कलाटे

भोसरी - अजित गव्हाणे

माजलगाव - मोहन जगताप

परळी - राजेसाहेब देशमुख

मोहोळ - सिद्धी रमेश कदम

कारंजा - ज्ञायक पटनी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

हिंगणघाट - अतुल वांदिले

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल