मुंबई महापालिकेचे उपायुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण, खंडणी आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. वांद्र्यातील एका आलिशान गृह प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवून राजकारणी, सनदी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जवळपास ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार निशित पटेल यांनी केला आहे. यासंबंधाने मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे
advertisement
प्रकरण काय आहे?
मुंबईतील वांद्र्यात गृहप्रकल्प सुरू होणार आहे. प्रकल्पात आगाऊ केवळ रोख स्वरुपाची गुंतवणूक केल्यास स्वस्तात घर घेण्याचे आमिष देण्यात आले.
प्रकल्पासाठी १०० टक्के आगाऊ रक्कम भरल्यास घर व्यावसायिक गाळे स्वस्तात देण्याचे आमिष, केवळ बांधकाम खर्चात घर देण्याचे कबलू करण्यात आले.
प्रकल्प बांधून झाल्यानंतर प्रकल्पाची किंमत दुपटीने वाढणार असल्याचा दावा करण्यात आला.
प्रकल्पात अनेक राजकारणी, बडे अधिकारी, आयपीएस अधिकाऱ्यांनी गुंतवणूक केल्याचा आरोप
अधिकाऱ्यांनी २० लाख ते २० कोटींपर्यंत गुंतवणूक केल्याचे तक्रारदाराचे आरोप
तक्रारदार निशित पटेल यांचे उपायुक्त महेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप
उपायुक्त पाटील यांनी आरोप फेटाळले
राजकारणी नेते, प्रशासनातील अधिकारी, बॉलिवूड सेलिब्रेटी यांच्याकडून ६० कोटी घेतले किंवा दिले, असे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत. हे आरोप पूर्णत: चुकीचे आहेत. माझ्यासमक्ष किंवा मला ओळखत असलेल्या अधिकाऱ्यांनी कोणतीही गुंतवणूक त्यांच्याकडे केलेली नाही. माझ्या अपरोक्ष कोणत्या गोष्टी झाल्या असतील तर मला यावर काही बोलता येणार नाही. निशित पटेल यांच्याकडे कोणतेही तांत्रिक कायदेशीर पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना सादर करावेत, असे सांगत आपल्यावरील आरोप त्यांनी फेटाळून लावले.
