अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने असून अर्जदारांना अर्ज जाहिरातीच्या PDF मध्ये देण्यात आला आहे. ऑफलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून शेवटची तारीख 04 नोव्हेंबरपर्यंत आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स (स्त्री) आणि स्टाफ नर्स (पुरूष) अशा दोन पदांसाठी नोकरभरती केली जात आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्जाची लिंक बातमीमध्ये दिली जात आहे. जाहिरात PDF मध्ये या दोन्हीही पदांसाठी लागणाऱ्या पात्रता देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये होणाऱ्या ह्या नोकर भरतीचा अर्ज सुद्धा त्या PDF मध्ये आहे.
advertisement
पात्र उमेदवारांना दरमहा 20,000 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. भरतीसाठी 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाइफ डिप्लोमा किंवा बी.एस.सी. नर्सिंग पदवीधारक अर्ज करू शकतात. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी असणे अनिवार्य आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे आहे. इच्छुक उमेदवारांनी "वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, एनएमएमपी मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर 15 ओ, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614" या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्जदारांनी अर्जात शैक्षणिक अर्हते बाबत सविस्तर आणि अचूक तपशिल नोंद करावा.
NMMC Recruitment 2025 Education Qualifications : शैक्षणिक पात्रता-
- उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमुद केलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्ज भरत असताना अंतिम वर्षाचे मिळालेले गुण आणि गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण आणि गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे.
- प्रमाणपत्रात नमूद गुण आणि गुणांची टक्केवारी अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यासअर्ज नामंजूर करण्यात येतील.
- उमेदवारांची अर्जामध्ये नमुद माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल.
- पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
NMMC Recruitment 2025 Experience Criteria : अनुभव -
- शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय, निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राहय धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही.
- अनुभवाचा तपशिल नमुद करीत असताना ज्या शासकीय, निम शासकीय व खाजगी कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच शासकीय, निम शासकीय व खाजगी कार्यालयाचा तपशिल फॉर्ममध्ये नमुद करावा. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राहय धरण्यात येणार नाही. अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमूद असावा.
- अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशिल नमुद करताना रुजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक सूचकपणे नमूद करावा. सदर कालावधी अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल.
- ज्या पदाकरीता अर्ज केला आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेला अनुभवच ग्राहय धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र -
लहान कुटूंबाची अट 23-07-2020 तारखेपासून लागू करण्यात आली आहे. 23-07-2020 तारखेपासून दोन पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमदेवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
