प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पाऊल
शहरांमध्ये वाहनांमुळे होणारे प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून, नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार वाढत आहेत. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.
नवी प्रणाली कशी काम करेल?
या निर्णयानुसार, पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनाचा क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे स्कॅन केला जाईल. जर वाहनाकडे वैध पीयूसी नसेल, तर याची माहिती वाहनचालकाला दिली जाईल. अशा परिस्थितीत वाहनचालकांना पंपावरच किंवा जवळच्या अधिकृत केंद्रांवर तातडीने पीयूसी काढून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे.
advertisement
बनावट पीयूसीला बसणार आळा
अनेक ठिकाणी बनावट पीयूसी प्रमाणपत्रे दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यावर उपाय म्हणून आता प्रत्येक अधिकृत पीयूसी प्रमाणपत्राला एक युनिक आयडी क्रमांक दिला जाईल, ज्यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल. सध्याच्या नियमांनुसार, वैध पीयूसी नसल्यास वाहनचालक आणि मालकाला दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. आता इंधनबंदीच्या या नव्या नियमामुळे वाहनचालकांना पीयूसी काढणे बंधनकारकच ठरणार आहे.
हे ही वाचा : UPI Cash Withdrawal New Rule: कॅश काढायला ATM ची गरज नाही, एका स्कॅनने मिळणार रोख रक्कम
हे ही वाचा : 1 लिटरमध्ये 35 किलोमीटरचं मायलेज! नवी Fronx मोडणार मायलेजचे सर्व विक्रम