काश्मिरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीचे जे तिघे मृत्यूमुखी पडले,त्यात हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा समावेश आहे. बुधवारी या सर्वांचे मृतदेह मुंबईत आणले आहेत. यामुळे डोंबिवलीमध्ये शोककळा पसरली असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. दुसरीकडे, याच हल्यात मृत्यू पावलेले अतुल मोने यांची कन्या ऋचा मोने हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
इतका भयानक हल्ला झाला. डोळ्यादेखत वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. अशा परिस्थितीतही ऋचाने आईला धीर दिला. एक मुलगा म्हणून ऋचाने आपल्या वडिलांना अग्नी दिला. एवढंच नाही तर एका मुलाप्रमाणे ऋचाने हेमंत जोशी यांचे नातेवाईक आणि संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांच्यासोबत शिवमंदीर स्मशान भूमीत ऋचाने संपूर्ण अंत्यविधी पिंडदान करत वडील अतुल मोने यांना अग्नी दिला.
हा प्रसंग पाहून अनेकांचे डोळे पानावले. अनेकांनी ऋचाचे धैर्याचं कौतुक केलं. एखाद्या पुरुषाला देखील जमणार नाही, अशा पद्धतीने ऋचाने धाडसाने ही सगळी परिस्थिती हाताळली आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे आभाळ फाटलं असताना, दु:खाचा डोंगर कोसळला असताना, तिने कुटुंबाला दिलेला धीर, आईला दिलेला आधार आणि वडिलांप्रती दाखवलेलं प्रेम या सर्व गोष्टींमुळे ऋचाच्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होतं. ऋचाला दहावीत ९२ टक्के मिळाले असून तिने सीए व्हावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. सध्या ऋचा CA चा अभ्यास करत आहे.
