तारापूर एमआयडीसीत कंपन्यांमधून वायूगळती होत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच घटना आज पुन्ही एकदा घडली आहे. तारापूर एमआयडीसीतील आदित्य इंडस्ट्री या कारखान्यात वायू गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या नागरीकांना डोकेदुखी, उलट्या आणि श्वसनाचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे.यामुळे परिसरातील नागरीक प्रचंड घाबरले आहेत.
आदित्य इंडस्ट्री या कारखान्यात वायू गळती ही घटना घडली आहे. कंपनीत उत्पादन सुरू असताना डायर मशीन मध्ये बॅग फाटून झालेल्या दुर्घटनेमुळे वायु गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या वायुगळतीमुळे आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना प्रचंड त्रास झाला होता.काही कामगारांना श्वसनाचा त्रास झाला होता. तर काहींना डोकेदुखी आणि उलट्याचा त्रास जाणवत होता. दरम्यान कामगारांना हा त्रास झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.
advertisement
दरम्यान या घटनेनंतर आता संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी जोर धरते आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.