खरं तर या घटनेतील पीडित पाच ते सहा जणांचे कुटुंब हे कमल गोपाल प्लाझा नावाच्या इमारतीत गेल्या 10 ते 15 वर्षापासून राहत आहेत.हे कुटुंबिय दिवाळीत आपआपल्या घरात सण साजरे करत असताना काही जणांनी अचानक येऊन त्यांच्या घरांना टाळ ठोकल्याची घटना घडली होती.त्यानंतर या कुटुंबियांनी घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता,दरवाजा उघडच नव्हता.त्यानंतर या कुटुंबियांना आपल्या घराला टाळ ठोकल्याची माहिती मिळाली होती.त्यामुळे अनेक कुटुंब घरात कोंडली गेली.
advertisement
इमारतीच्या ड्रेनेजचं पाणी उघड्यावर येत असल्याने ग्रामसेवकासह उपसरपंच यांनी इमारतीतील घरांना बाहेरून टाळ ठोकत काही कुटुंबांना घरातच कोंडल्याचा आरोप या पिडीत नागरीकांनी केला होता. या घटनेची माहिची पिडित कुटुंबियांना मिळताच त्यांनी ग्राम विस्तार अधिकारी दिघा , उपसरपंच हरेश मुकणे आणि ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गायकवाड यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच या घटनेत ड्रेनेज लिकेज असल्याने पाणी उघड्यावर आल्याचा तक्रारदारांचा पोलीस तक्रारीत खुलासा केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
