TRENDING:

"कुणाची सुपारी घेऊन आलात, शरम नाहीये का?" दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे संतापल्या, नक्की काय घडलं?

Last Updated:

तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात, मला माहीत नाही. तुम्हाला शरम नाही. मी असे माणसं सांभाळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी टीकास्र सोडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावघाट येथील भगवान भक्तीगडावर पार पडत आहे. या मेळाव्यातून पंकजा मुंडे नक्की काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देशात पूरजन्य परिस्थिती आणि बीडमधील मराठा विरुद्ध ओबीसी सुरू असलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांवर संतापल्या.
advertisement

तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात, मला माहीत नाही. तुम्हाला शरम नाही. मी असे माणसं सांभाळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी टीकास्र सोडलं आहे. मी इतकी वर्षे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणा कधी पाहिला नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी प्रेक्षकांना झापलं.

यावेळी अजित पवार गटाचे आमदार आणि पंकजा मुंडेंचे बंधू धनंजय मुंडे यांनी देखील हुल्लडबाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उभं राहून रागात प्रेक्षकांच्या दिशेनं कटाक्ष टाकला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण कार्यकर्ते शांत झाले नाही. शेवटी पंकजा मुंडे यांनी झापल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. पंकजा मुंडे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या मदतीबाबत बोलत होत्या. याच वेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर पंकजा मुंडेंचा पारा चढला.

advertisement

पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

प्रेक्षकांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, "तुम्ही वाटोळं केलं पोरांनो, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात, माहीत नाही. तुम्हाला शरम नाहीये. जर कुणाचं वाईट झालं तर, जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती. जी शरम माझ्या नजरेत होती. ती शरम तुमच्या नजरेत दिसत नाही. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलात, हे मला कळलं आहे. जो दसरा मेळावा माझ्या भगवानगडावर व्हायचा, तो माझ्याकडून हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही माझ्याकडून हिरावून घ्यायला आला आहात, असं वाटायला लागलं आहे. मी इतकी वर्षे इथं भाषण केलं, पण कुणी इतकं बेशिस्त वागलं नाही, तुम्ही शुद्धीवर नाहीत. अशी माणसं मी सांभाळतच नाही."

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"कुणाची सुपारी घेऊन आलात, शरम नाहीये का?" दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे संतापल्या, नक्की काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल