TRENDING:

PA वर गंभीर आरोप, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, त्याने रडत रडत फोन केला अन्...

Last Updated:

मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी जीवन संपवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने गंभीर आरोप करून आयुष्याला पूर्णविराम दिला. मुंबईतील वरळीच्या घरात अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरीने आत्महत्या केली. या प्रकरणात गौरीच्या कुटुंबाकडून अनंत यांच्यावर हत्येचे आरोप होत आहेत. याच गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून कारवाईत कसूर राहू नये, याची पोलिसांनी काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
advertisement

मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच दोघांचे लग्न झाले होते. या लग्नाला पंकजा मुंडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत उपस्थित होत्या. आज सकाळपासून माध्यमांनी पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकावर गंभीर आरोप अशा बातम्या चालविल्याने त्यांनी रविवारी दुपारी प्रसिद्धीपत्रक काढून घटनेवर शोक व्यक्त केला.

advertisement

त्याने रडत रडत फोन केला...

दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती.

पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे पंकजा मुंडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हणाल्या.

advertisement

नवऱ्याचे दुसऱ्या मुलीशी संबंध, डॉ. गौरी कोसळून गेल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्हाला माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक; समजून घ्या!
सर्व पहा

पंकजा मुंडे अनंत गर्जे याला मुलासारख्या मानायच्या. अनंत गर्जे हे गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत. गर्जे यांच्या पत्नी मुंबईतील केईएम रूग्णालयात काम करायच्या. आपल्या पतीचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध असल्याच्या संशय त्यांना होता. तसेच त्यासंबंधीचे काही पुरावे देखील त्यांच्या हाताला लागले होते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PA वर गंभीर आरोप, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, त्याने रडत रडत फोन केला अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल