नवीन पनवेल, खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नावडे, करंजाडे, उळवे या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. याशिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्यांसाठी पुष्पक नगर आणि नैना क्षेत्रातील नेरे, पळसपे, पोयंजे येथेही विकास सुरू आहे. सध्या या भागात नवी मुंबई महापालिका (एनएमएमटी), बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बससेवा कार्यरत आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि प्रवासाची गरज पाहता स्वतंत्र बससेवेची मागणी वाढली आहे.
advertisement
Konkan Railway: एका क्लिकवर मिळणार कोकण रेल्वेची A टू Z माहिती, प्रवाशांसाठी 'केआर मिरर' लाँच
पनवेल महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने या प्रस्तावासाठी नामांकित आणि अनुभवी एजन्सीची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही एजन्सी प्रवासी संख्येचा अंदाज, बससेवा फायदेशीर राहील का आणि बस मार्गांची उपयुक्तता यासह विविध बाबींचा सविस्तर अभ्यास करेल. अहवालात सादर केलेल्या तांत्रिक व आर्थिक बाबींचा अभ्यास करून पुढील धोरण ठरवलं जाईल.
पनवेल महानगरपालिका परिवहन विभागाचे उपायुक्त अभिषेक पराडकर म्हणाले, "या प्रस्तावामुळे पनवेलकरांना लवकरच स्वस्त, सुलभ आणि रिंग रोडच्या माध्यमातून अंतर्गत प्रवासासाठी दर्जेदार बससेवा मिळू शकते. मनपाची स्वतंत्र सेवा सुरू करावी की, एनएमएमटी सोबत भागीदारीत बस चालवावी याबाबतचा निर्णय सर्वेक्षण अहवालानंतर घेतला जाणार आहे."