TRENDING:

Blinkit वरून चिकन मागवलं पण मांस डुक्कराचं असल्याचा संशय, लोकांनी गोडाऊन फोडलं, मुंब्य्रातील घटना

Last Updated:

blinkit च्या गोडाऊनमध्ये जाऊन सदर ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत त्यांनी जाब विचारणा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : काही दिवसांपूर्वी कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये हॉटेलमधील पार्सलमध्ये झुरळ आणि अळी आढळली होती. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ग्राहकाने blinkit या ऑनलाईन स्टोअरवरून चिकनची ऑर्डर केली होती. पण चिकनच्या पार्सरमध्ये डुक्कराचे मांस आढळल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे संतप्त जमावाने blinkit  गोडाऊनची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील एम एम व्हॅली या ठिकाणी ग्राहकाने चिकनची ऑर्डर ऑनलाइनरित्या blinkit वर  दिली होती. blinkit   नावाच्या ऑनलाईन सेवेद्वारे ही ऑर्डर करण्यात आली होती. मागवलेल्या ऑनलाईन पदार्थांमध्ये संबंधित ग्राहकाला संशय आल्यानंतर त्याने संबंधित blinkit  च्या गोडाऊनमध्ये जाऊन या सदर प्रॉडक्ट विषयी जाब विचारणा केली.

सदर ग्राहकाला या ऑर्डर केलेल्या चिकनमध्ये डुक्कराचं मांस असल्याचा संशय आला. यासंदर्भात blinkit च्या गोडाऊनमध्ये जाऊन सदर ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत त्यांनी जाब विचारणा केली. त्यावेळी सदर कर्मचाऱ्याला देखील आपण कोणतं प्रॉडक्ट सेल करतो, याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे जमलेल्या जमावाकडून गोडाऊनची तोडफोड करण्यात आली.

advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  blinkit च्या  गोडाऊनवर धाव घेतली. गोडाऊनवर मोठ्या संख्येनं जमाव जमला होता, पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Blinkit वरून चिकन मागवलं पण मांस डुक्कराचं असल्याचा संशय, लोकांनी गोडाऊन फोडलं, मुंब्य्रातील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल