TRENDING:

पुण्यात निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांची पोरंबाळं, कोण कोण येणार घराणेशाहीच्या मार्गाने लोकशाहीच्या मंदिरात?

Last Updated:

घराणेशाहीची लागण केवळ भाजपला झालीय असं नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेतही तेच चित्र आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांऐवजी घराणेशाहीला झुकतं माप दिलंय. त्यामुळ निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांच्या नात्यागोत्याचा गोतावळा उमेदवार यादीत पाहायला मिळणार आहे
News18
News18
advertisement

आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला वेगळं राजकीय महत्वप्राप्त झालं आहे. कारण उमाताई खापरे ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत त्या पक्षानं नेहमीच काँग्रेसच्या घराणेशाही विरोधात राण पेटलंय. पण असं असलं तरी त्यांचा मुलगा जयदीप खापरे यंदा भाजपकडून पालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. पण घराणेशाहीची लागण केवळ भाजपला झालीय असं नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेतही तेच चित्र आहे.

advertisement

पिंपरी चिंचडवड शहरातील घराणेशाहची यादी

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा विश्वजित बारणे हे पालिका निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेही राजकीय राज्याभिषेकाच्या तयारीत आहेत. अर्थातच, उमेदवार म्हणून आपली मुलं कशी उजवी आहेत आणि पक्षासाठी त्यांचं योगदान किती मोठं आहे हे सांगायला हे नेते विसरत नाहीत. पिंपरी चिंचवड शहरातील घराणेशाहीची ही यादीत संपत नाही.

advertisement

कोण कोण उतरलंय निवडणुकीच्या रिंगणात?

अलिकडच्या काळातचं भाजपनं विधान परिषदेसाठी संधी दिलेले आमदार अमित गोरखे यांची अनुराधा गोरखे, राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम , शिवसेना शहर अध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांचा मुलगा आणि पत्नी ,तसेच भोसरीचे आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे हे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

advertisement

नातेवाईकांना उमेदवारी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सर्वपक्षिय घराणेशाही पाहायला मिळतेय. खरं तर नेत्यांसाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी या निवडणुका असतात. पण यंदा पिंपरी चिंचवडमधील नेत्यांनीच आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांची पोरंबाळं, कोण कोण येणार घराणेशाहीच्या मार्गाने लोकशाहीच्या मंदिरात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल