TRENDING:

गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पिस्तुलीबद्दल पोलिसांनी कोर्टात दिली मोठी माहिती

Last Updated:

गोविंद बर्गे यांनी पूजाच्या धमक्यांना घाबरून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पण, या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर: कला केंद्रातील नर्तिकच्या प्रेमात पडून पैसा उधळला, सोन्यानं मढवलं आणि जमिनी सुद्धा नावावर केली. पण, तिच्या प्रेमात अडकलेल्या बीडमधील गेवराई येथील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजाच्या धमक्यांना घाबरून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पण, या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. ज्या पिस्तुलीतून गोविंद बर्गेंनी आत्महत्या केली, ती पिस्तुल बर्गेंची नसल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे ही पिस्तुल नेमकी कुणाची होती, हा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे.

advertisement

9 सप्टेंबर २०२५ रोजी  गोविंद बर्गे यांनी वैराग इथं येऊन पूजा गायकवाडच्या घरासमोर एका कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पारगाव येथील कला केंद्रातील नर्तिक पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे. कोठडी संपल्यानंतर पूजाला आज शनिवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी वापरलेल्या पिस्तुलीबद्दल नवीन दावा केला आहे.

advertisement

(Govind Barge Case: कातील पूजाच्या अडचणीत वाढ, पोलिसांचा मोठा दावा, बार्शी कोर्टातून मोठी अपडेट)

पोलिसांनी कोर्टात काय दावा केला? 

ज्या दिवशी बर्गेंनी आत्महत्या केली, त्या दिवशी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये फोनवर काय संवाद झाला हे तपासायचं आहे. यासाठी  पूजा गायकवाडच्या फोनचा सीडीआर काढणे गरजेचं आहे आणि त्याचं विश्लेषण करणं आहे.  गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली, ते पिस्तूल गोविंद बर्गेंचं नसल्याचं आलं समोर आहे.  गोविंद बर्गे यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे पिस्तूल नसल्याचं तपासात उघड झालं आहे. सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्याकडून खरेदी केलं असावं असा दावा पोलिसांनी केला आहे. या पिस्तुलीचा त्याचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू आहे.

advertisement

पूजाने आणखी कुणा-कुणाला फसवलं? 

कला केंद्रात काम करणारी पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासारख्या किती जणांना फसवलं आहे, याचा तपास करायचा आहे.  त्यामुळे तिची कोणत्या बँकेत खाती आहे,  बँक स्टेटमेंटवरून आर्थिक व्यवहारांची तपासणी पोलीस करणार आहे.  पूजा गायकवाड हिने अजून गोविंद बर्गे सारखं कुणाला फसवलं आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.

advertisement

आणखी किती जमिनी बर्गेकडून घेतल्या? 

पोलिसांनी पूजा गायकवाडने अजून एक खरेदी-विक्रीचा दस्त सांगितला आहे, तो मिळवण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. त्या दिवशी बर्गे यांनी पूजाला फोन केले होते. त्या दोघांचे कॉल डिटेल्स आणि चॅटिंग यातून काय काय तपास होऊ शकतो, या संदर्भात युक्तिवाद करण्यात आला होता. पूजा गायकवाड आणि इतर जे बँक खाते आहे, त्याच्या तपासणीसाठी यातून आर्थिक व्यवहार उघड होतील, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.

पूजाला २ दिवसांची पोलीस कोठडी

कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला.  पोलिसांनी  पूजा गायकवाड हिच्या पुढील तपासासाठी वैराग पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाड दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे आता पोलीस आता पूजाने किती संपत्ती जमवली, बर्गे यांच्याशी फोनवर काय बोलली, चॅट काय होतं, याची तपासणी करणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पिस्तुलीबद्दल पोलिसांनी कोर्टात दिली मोठी माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल